Añadir traducción en paralelo Imprimir Opciones de la página

धान्याचे खळे

काही दिवसांनी रूथची सासू नामी रूथला म्हणाली, “मुली, आता मला तुझ्यासाठी नवरा आणि चांगले घर शोधून काढायला हवें. त्यातच तुझे भले आहे. बवाज त्यासाठी योग्य आहे तो आपला जवळचा आप्तच [a] आहे. त्याच्याकडच्या कामकरी बायकांबरोबर तू काम केले आहेस. आज रात्री तो खळ्यात मळणीसाठी मुक्कामाला असेल. त न्हाऊन माखून तयार हो. चांगले ठेवणीतले कपडे घाल आणि रात्री खव्व्यावर जा. बवाजचे जेवणखाण होईपर्यंत त्याच्या नजरेला पडू नको. जेवण झाल्यावर तो विश्रांती घ्यायला आडवा होईल. लक्ष असू दे म्हणजे तो कुठे आहे ते तुला कळेल. तेव्हा तू पुढे हो आणि त्याच्या पायावरचे पांधरूण काढून [b] तिथेच त्याच्याजवळ पड लगेच काय करायचे ते तोच मग तुला सांगेल.”

तेव्हा रूथने सासूच्या म्हणण्याप्रमाणे वागायचे कबूल केले.

ती खव्व्याकडे गेली. सासूने सांगितले होते त्याप्रमाणे वागली. जेवणखाण झाल्यावर बवाज समाधानाने सुस्तावला. धान्याच्या राशीजवळच झोपायला गेला. तेव्हा अजिबात चाहूल लागू न देता रूथ तिथे गेली आणि त्याच्या पायावरचे पांघरूण तिने दूर सारले. मग त्याच्या पायाशी पडून राहिली.

मध्यरात्रीच्या सुमाराला बवाज झोपेतच कुशीवर वळला आणि जागा झाला. आपल्या पायाजवळ एका बाईला पाहून तो डचकला. ती कोण, काय हे त्याने विचारले.

ती म्हणाली, “मी रूथ तुमची दासी. तुम्ही आपले पंख माझ्यावर पसरा [c] तुम्हीच माझे त्राते [d] आहात.”

10 तेव्हा बवाज म्हणाला, “परमेश्वर तुझे भले करो. माझ्यावर तुझ्या प्रेमाची पाखर तू घातली आहेस. तू नामीशी आधी वागलीस त्यापेक्षाही भलेपणाने तू माझ्याशी वागते आहेस. तू तूझ्या जोगा गरीब, श्रीमंत अशा कोणत्याही तरूण मनुष्याबरोबर गेली असतीस. पण तू तसे केले नाहीस. 11 तेव्हा आता घाबरू नकोस. तू म्हणशील तसे मी करतो. तू एक चांगली बाई आहेस हे गावातील लोकांना ठाऊक आहे. 12 शिवाय, मी तुमचा जवळचा नातलग आहे हेही खरे. पण माझ्याहीपेक्षा जवळचा असा तुमचा एक आप्त आहे. 13 आजची रात्र तू इथेच राहा. तो तुला मदत करतो का ते मी सकाळी त्याला विचारून बघतो. तो तयार झाला तर उत्तमच. पण त्याने नकार दिला तर परमेश्वरची शपथ मी तुझ्याशी लग्न करीन. अलीमलेखची गेलेली जमीन तुम्हाला परत मिळवून देईन [e] तेव्हा सकाळपर्यंत इथेच थांब.”

14 त्याप्रमाणे रूथ सकाळपर्यंत बवाजच्या पायाजवळ पडून राहिली. फटफटायच्या आधीच अजून अंधार असतानाच लोक एकमेकांना ओळखायला लागण्यापूर्वीच ती उठली.

बवाज तिला म्हणाला, “कालची रात्र तू इथे होतीस हे कोणाला कळू द्यायचे नाही.” 15 पुढे तो म्हणाला, “तू पांघरलेला रूमाल काढ आणि समोर पसर.”

तिने तो पसरल्यावर त्याने एक बुशेल माप सातू त्यात टाकले. तिच्या सासूसाठी ती भेट होती. नीट गाठोडे बांधून त्याने ते तिच्या हवाली केले.मग तो शहरात निघून गेला.

16 रूथ सासूकडे गेली. सासूने दाराशी येऊन कोण आहे ते पाहिले.

रूथने घराते येऊन बवाज बरोबर जे जे घडले ते सांगितले. 17 ती म्हणाली, “त्याने तुमच्यासाठी भेट म्हणून हे सातू दिले आहे. रिकाम्या हाताने तुमच्याकडे यायचे नाही असे त्याने मला बजावले.”

18 नामी म्हणाली, “मुली, पुढे काय होणार आहे हे आपल्याला कळेपर्यंत धीर धर. अंगावर घेतलेले काम पार पडेपर्यंत तो स्वस्थ बसणार नाही. दिवस मावळायच्या आतच काय ते आपल्याला कळेल.”

Notas al pie

  1. रूथ 3:2 जवळचा आप्त रूथला मुलेव्हावीत म्हणून हा तिच्याशी लग्न करू शकतो. याने त्या कुटुंबाची घेतली तरी मालमतेवर त्याचा हक नसतो. ती मृताच्या नावावर राहते.
  2. रूथ 3:4 पायावरचे पाघंरूण काढून आपला त्राता होण्याबद्दल ती बवाजला विनंती करते असे यातून सूचित होते.
  3. रूथ 3:9 पंख माझ्यावर पसरा किंवा “मला आपल्या पंखाखाली घ्या” रूथला मदत आणि रक्षण हवे आहे असा याचा अर्थ.
  4. रूथ 3:9 त्राते रूथशी, तिला मुलेबाळे व्हावीत म्हणून, लग्न करणारा. कुटुंबाची जबाबदारी घेतली तरी त्या कुटुंबावर व मालमतेवर त्याचा हक्क रूथच्या मृत नवऱ्याचेच.
  5. रूथ 3:13 अलीमलेखची …देईन शब्दश, मी तुला मुक्त करीन, तुझी सोडवणूक करीन.