A A A A A
Bible Book List

लेवीय 27 Marathi Bible: Easy-to-Read Version (ERV-MR)

नवस महत्वाचे आहेत

27 परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांना सांग: एखाद्या माणसाने परमेश्वराला मानवाचा विशेष नवस केला तर त्या माणसाचे मोल याजकाने येणेप्रमाणे ठरवावे: वीस ते साठ वर्षे वयाच्या आतील पुरुषाचे मोल पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे पन्नास शेकेल रुपे आसावे, आणि त्याच वयाच्या स्त्रीचे मोल तीस शेकेल रुपे असावे; मुलगा पांच वर्षे ते वीस वर्षांच्या आतील वयाचा असेल तर त्याचे मोल वीस शेकेल रुपे व मुलीचे दहा शेकेल रुपे असावे. मुलगा एक महिन्याहून मोठा व पांचवर्षाहून लहान असला तर त्याचे मोल पांच शेकेल रुपे व मुलीचे तीन शेकेल रुपे असावे. साठ वर्षे वा साठ वर्षाहून अधिक वर्षे वयाच्या पुरुषाचे मोल पंधरा शेकेल रुपे व स्त्रीचे दहा शेकेल रुपे असावे.

“परंतु तू ठरविलेले मोल न देण्याइतका कोणी गरीब असेल तर त्याला याजकापुढे आणावे; आणि याजकाने नवस करणाऱ्याच्या ऐपतीप्रमाणे नवसाच्या मानवाचे मोल ठरवावे.

परमेश्वराला द्यावयाच्या देणग्या

“काही पशू परमेश्वराला अर्पण करता येतात त्यापैकी कोणी एखाद्या पशूचा नवस केला तर परमेश्वराला अर्पावयाचा असा प्रत्येक प्राणी पवित्र समजावा. 10 त्याने तो बदलू नये किंवा त्याच्या ऐवजी दुसरे काही देण्याचा प्रयत्न करु नये. त्याने वाईट पशू ऐवजी चांगला किंवा चांगल्याबद्दल वाईट असा बद्दल करूं नये त्याने जर तसा बदल करण्याचा प्रयत्न केला तर मग ते दोन्ही पवित्र होतील व दोन्ही परमेश्वराच्या मालकीचे होतील.

11 “काही पशू परमेश्वराला अर्पण करावयास योग्य नसतात-ते अशुद्ध असतात-कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वराला अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा. 12 तो पशू चांगला असो किंवा वाईट असो याजकाने त्याचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 13 पण नवस करणाऱ्याला तो पशू सोडवावयाचा असला तर त्या किंमतीत आणखी एकपंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा.

घराचे मोल

14 “एखाद्याने आपले घर परमेश्वराला वाहिले तर ते चांगले असो किंवा वाईट असो याजकाने त्या घराचे मोल ठरवावे; याजक ठरवील ते त्याचे मोल समजावे. 15 परंतु घर वाहणाऱ्याला ते सोडवून परत घ्यावयाचे असेल तर त्याने, याजकाने ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून ते सोडवावे; मग ते घर त्याचे होईल.

मालमत्तेचे मोल

16 “एखाद्याने आपल्या शेतीचा काही भाग परमेश्वराला वाहिला तर त्यात किती बियाणे पेरले जाते त्यावरुन त्याचे मोल ठरेल; एक होमर [a] सुमारे सहा बुशेल जवासाठी पन्नास शेकेल [b] रुपे अशी किमत असावी. 17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल. 18 परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वराला वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करुन याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे. 19 शेत वाहणाऱ्याला, मोल देऊन आपले शेत सोडवून परत घ्यावयाचे असले तर त्याच्या ठरविलेल्या किंमतीत एकपंचमांश भर घालून त्याने ते सोडवावे. मग ते शेत परत त्याच्या मालकीचे होईल. 20 त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही; 21 पण योबेल वर्षी ते शेत परत विकत घेतले नाही तेव्हा पूर्णपणे समर्पित केलेल्या शेताप्रमाणे परमेश्वराकरिता ते पवित्र ठरेल, अर्थात ते याजकाचे कायमचे वतन होईल!

22 “स्वतःच्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वतः खरेदी केलेले शेत त्याला परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल. 23 तर याजकाने योबेल वर्षापर्यंत त्याचा हिशोब करावा व जितके मोल ठरेल तितके परमेश्वराकरिता पवित्र समजून त्याने त्याच दिवशी ते देऊन टाकावे. 24 ज्याच्याकडून त्याने ते शेत पहिल्यांदा खरेदी केलेले असेल म्हणजे ज्याच्या वतनाचे ते असेल त्याच्या ताब्यात ते योबेल वर्षी परत जावे.

25 “मोल देताना ते पवित्रस्थानातील चलनाप्रमाणे ठरविलेले असावे. शेकेल म्हणजे वीस गेरा. [c]

पशूंचे मोल

26 “लोकांना गुरेढोरे, शेरडेमेढंरे विशेष देणग्या म्हणून अर्पण करता येतील परंतु त्यापैकी प्रथम जन्मलेला नर परमेश्वराचा ठरलेला आहेच; त्याला, ते विशेष भेट म्हणून वाहू शकणार नाहीत. 27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूंपैकी असला तर याजकाने ठरविलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरविलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.

विशेष देणगी

28 “लोक परमेश्वराला काही विशेष देणगी देतात, ती देणगी माणसे, पशू किंवा वतनांची शेते ह्या प्रकारची असेल; ती देणगी परमेश्वराचीच आहे; ती सोडवून परत घेता येणार नाही किंवा विकता येणार नाही. 29 ती वाहिलेली विशेष देणगी मानव प्राण्यांपैकी असेल तर त्या मानवाला सोडवून घेता येणार नाही; त्याचा अवश्य वध करावा.

30 “भूमीच्या सर्व उत्पन्नाचा एकदशांश भाग म्हणजे शेतातील सर्व उपज आणि झाडे वेली ह्यांची फळे ह्यांचा एकदशांश भाग परमेश्वराकरिता आहे. 31 म्हणून एखाद्याला आपला एकदशांश भाग सोडवून घ्यावयाचा असला तर त्याच्या किंमतीत एकपंचमांशाची भर घालून त्याने तो सोडवावा.

32 “गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे असेल. 33 निवडलेला पशू चांगला आहे किंवा वाईट आहे ह्या विषयी त्याच्या धन्याने चिंता करु नये किंवा त्याला बदलू नये; त्याने बदल करावयाचे ठरविले तर मग तो पशू व त्याच्या बदलीचा पशू असे दोन्ही पशू परमेश्वराकरिता पवित्र होतील; किंमत देऊन ते सोडविता येणार नाहीत.”

34 परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.

Footnotes:

  1. लेवीय 27:16 होमर 6 बुशेल एवढे एक कोरडे माप.
  2. लेवीय 27:16 शेकेल किंवा औसाच्या 2/5.
  3. लेवीय 27:25 एक गेरा म्हणजे एकपन्नासांश औंस.
  Back

1 of 1

You'll get this book and many others when you join Bible Gateway Plus. Learn more

Viewing of
Cross references
Footnotes